First steps for Online School at Walnut

प्रिय पालक,

वॉलनट मध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही वॉलनट परिवाराचा भाग आहात याचा आम्हाला खूप आनंद आहे. तुम्हाला आमच्या शिक्षण पद्धतीची ओळख करून देण्यास आम्ही उत्सुक आहोत. आम्हाला खात्री आहे की आमच्या admission counsellors नी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे शाळेबद्दल माहिती सांगितली असेल तसेच शाळेचे एकंदर वातावरणही तुम्हाला आवडले असेल. तरीही पालक आणि विद्यार्थ्यांसाठी walnut learning system कशी work होते याची अजून माहिती घेऊया.

1) तुम्ही शाळेत admission घेतली की तुम्हाला एक email येते - ‘Welcome to the Walnut Family!’ या ई-मेल मध्ये तुमच्या पाल्याचा walnut email ID आणि walmiki app (e-learning app) साठी लागणारे सर्व login details दिले असतील.

2) कोरोना काळात, आमची अशी एकमेव शाळा असेल जी अगदी एका आठवड्यात online सुरु झाली. ऑनलाईन शाळा चालू असताना त्यामध्ये Walmiki, Google Classrooms आणि Google Meet या तिन्ही गोष्टी वापरल्या जातात. Google Classrooms ला कसे login करायचे, हे जाणून घेण्यासाठी या link वर click करा.

3)तुमच्या पाल्याला या वर्षीच्या, त्या इयत्तेच्या, अनेक विषयांच्या Classrooms मध्ये add करण्यात येईल. त्याने / तिने सर्व Classrooms चे invitations accept केले आहेत याची खात्री करावी.

4) Worksheets आणि इतर साहित्य collect करण्यासाठी तुम्हाला शाळेकडून एक SMS ही करण्यात येईल. त्या SMS मध्ये दिलेल्या वेळेत, तुमच्या सोयीनुसार शाळेत येऊन तुम्हाला हे शैक्षणिक साहित्य घ्यायचे आहे.

5) दिलेले शैक्षणिक साहित्य (print व electronic) कसे वापरायचे यासंदर्भात हे पत्रक वाचा.

6)तसेच विद्यार्थ्यांसाठी सोमवार ते शुक्रवार,वेळापत्रकानुसार 'live classes' होतील. हे वेळापत्रक तुम्हाला Announcing the start of "Live Teaching". या ई-मेल मध्ये पाठवण्यात आले आहे. या ई-मेल मध्ये Google Meet च्या live classes ची link देखील दिली आहे.

7) तुम्हाला दर आठवड्याला ‘Academic Schedule for (date range) for Class (Std. Div)’ या नावाची एक ई-मेल येईल. यामध्ये दर दिवशी तुमचे पाल्य काय शिकणार आहे, याची माहिती असेल. यामध्ये worksheet, answer sheet, PowerPoint presentations, teacher’s instructions, quizzes आणि lectures, तसेच त्या विषयाच्या Classroom ची link ही दिली असेल.

खाली त्या ई-मेल चा एक नमुना:

ही ई-मेल आदल्या आठवड्यात पाठवण्यात येईल जेणेकरून तुम्हाला त्या त्या दिवशी चे material तयार करून ठेवता येईल. घरी जागा आणि साहित्याच्या मर्यादेची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे आम्ही 'live classes' attend करण्यासाठी सक्ती करत नाही. त्यासाठीच आम्ही ई-मेल मध्ये प्रत्येक तासाचे details दिले आहेत जेणेकरून पाल्याला त्याच्या वेळेनुसार अभ्यास करता येईल.

8) जर विद्यार्थ्यांचा एखादा तास बुडाला , तर आम्ही 'live classes चं recording' देखील उपलब्ध करून देतो. त्याची Drive Link तुम्हाला पुढच्या आठवड्यात कळवली जाते. त्या लिंक वर तुम्हाला त्या आठवड्याचे, सर्व विषयांचे recordings दिनांकानुसार मिळतील.

9) विद्यार्थ्यांना Google Classrooms द्वारा त्या त्या दिवशीचा homework दिला जातो. तो submit करण्याची अंतिम तारीख ही त्यात नमूद केलेली असते. आपले पाल्य सर्व विषयांचा गृहपाठ वेळच्या वेळी पूर्ण करून submit करत आहे, याची खात्री करावी.

10) आमचे विद्यार्थ्यांच्या उपस्थिती आणि assignments वर लक्ष असते. त्यामुळे मुलांच्या तब्येतीबद्दल किंवा एकूणच त्यांच्यासाठी शाळेतून phone किंवा SMS आला तर आश्चर्यचकित होऊ नका.

11) पूर्ण केलेला गृहपाठ submit कसा करायचा, याबद्दलच्या माहितीसाठी How to submit HW assignments : Google Classroom ही ई-मेल वाचावी.

12) आम्ही एवढ्यावरच आपल्याशी संपर्क थांबवलेला नाही. 🙂 दर आठवड्याच्या शेवटी तुम्हाला ‘Academic update for (date duration) for Class (Std. Div.)’ ही ई-मेल येईल. यामध्ये तुमचे पाल्य त्या आठवड्यात काय काय शिकले याचे details दिले असतील. त्यामुळे शाळेत काय काय शिकवून झाले आहे याचा अंदाज तुम्हाला येईल तसेच पाल्याकडून सरावही करून घेता येईल.

13) प्रत्येक इयत्तेसाठी 'Announcements' नावाची एक खास Classroom केली आहे. सर्व circulars, notices आणि updates या Classroom मध्ये post केले जातील. त्यामुळे ही Classroom दररोज check करा.

14) याखेरीज तुम्हाला Walnut learning system बद्दल अजून काही प्रश्न असतील तर खालील दोन documents वाचा :

New to Walnut? Here are some FAQs

Frequently Asked Questions : Google Classroom

आम्हाला ठाऊक आहे, की सुरुवातीला वाचताना ही सर्व माहिती खूप जास्त वाटत असेल. पण ही शिक्षण पद्धती खूप फायदेशीर आहे तसेच पालक आणि मुलांच्या फारच पसंतीस उतरत आहे. 

आमच्या तुमच्याकडून पालक म्हणून काही अपेक्षा आहेत : 1) तुमचा mail box रोज check करा. Walnut School शाळेसंदर्भातील महत्वाच्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी वेळोवेळी emails करत असते. 2) दिवसातून एकदा Google Classrooms check करा. त्यावरून तुम्हाला तुमच्या पाल्याच्या pending assignments चा अंदाज येईल. तसेच गरज असल्यास वेळोवेळी recordings ही check करत राहा. 3) आमच्या सर्व उपक्रमांत सहभागी व्हा. तुमच्या रोजच्या कामातून तुम्हाला एक छान break मिळेल. 4) शाळेतून phone आल्यावर, मुलांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी अधूनमधून आमच्या शिक्षकांशी बोलत राहा. 5) बस इतकंच! इतकं केल्याने तुमचे पाल्य Walnut learning system मध्ये रुळणार आहे आणि यशस्वी होणार आहे. .

आमच्या इतर विद्यार्थी आणि शिक्षकांप्रमाणेच तुम्हीही ही शिक्षण पद्धती enjoy कराल अशी आशा आहे.